सत्ता गेली पण माज जात नाही, पडळकरांच्या निशाण्यावर जयंत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gopichand padalkar on jayant patil on assembly election 2022

'आदिवासी असूनही चांगलं काम केलं' या विधानाचा अर्थ काय? जातीयवाद यांच्या मनात रूजलाय

सत्ता गेली पण माज जात नाही, पडळकरांच्या निशाण्यावर जयंत पाटील

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. यासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान, भाजपाचे नार्वेकर यांनी १६४ सदस्यांचं बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत. दरम्यान, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आज सत्ताधारी आणि विरोधी गटातील नेत्यांनी भाषणे केली. (Gopichand padalkar on jayant patil on assembly election 2022)

राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यासह सुनिल प्रभु आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बंडखोर आमदार आणि भाजपवर निशाणा साधला. दरम्यान, यावरून आता भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. यांसदर्भात त्यांनी एक ट्वीट केल आहे.

हेही वाचा: शिवसेनेचा व्हिप धुडकावत शिंदे गटाचा राहुल नार्वेकरांना पाठिंबा

ट्वीटमध्ये पडळकर म्हणतात, जयंत पाटलांनी केलेल्या 'आदिवासी असूनही चांगलं काम केलं' या विधानाचा अर्थ काय? जातीयवाद यांच्या मनात रूजला आहे. मी तमाम दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त बांधवांच्या वतीने या विधानाचा जाहिर निषेध करतो. सत्ता गेली पण माज जात नाही, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी आदिवासी असूनही चांगले काम केले असल्याचा दाखला एका नेत्याला दिला आहे. यावरून त्यांच्यावर टीका होत आहे.

हेही वाचा: काँग्रेसनं बंडखोर आमदारांना शहाजी पाटील स्टाईलनं डिवचलं; म्हणे, ५० खोके...

दरम्यान, नेत्यांच्या टोलेबाजी मुळे काही काळ सभागृहाच हास्यकल्लोळ होत राहिला. या निवडप्रक्रियेत राहुल नार्वेकरांना बहुमत मिळालं असून राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली आहेत. त्यामुळं राहुल नार्वेकर विजयी झाले असून भाजपा-शिंदे सरकारची विधानसभेवर वर्णी लागली आहे. राहुल नार्वेकर यांना १६४ सदस्यांचे मतदान झाले असून बहुमताचा आकडा पार केला आहे. बहुजन विकास आघाडी आणि मनसेनेही राहुल नार्वेकरांना मतदान केलं आहे.

Web Title: Gopichand Padalkar Criticized To Jayant Patil On Assembly Election Speech

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top