
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याने गुरुवारी जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यावर विधानभवनात हल्ला केल्यानंतर गोपीचंद पडळकर चांगलेच चर्चेत आले आहेत. हा हल्ला गोपीचंद पडळकरांच्या सांगण्यावरुनच झाला असल्याचा आरोप आव्हाडांनी केला आहे. दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी आज विधीमंडळात लक्षवेधीदरम्यान तालिका अध्यक्षांसह एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यालाही टार्गेट केले. दोघांमध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले. शिक्षणमंत्री दादा भुसे आणि गोपीचंद पडळकर यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.