
राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकाचे फिल्मी स्टाईल अपहरण झाल्याचा प्रकार समोर आला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्याच्या उद्देशाने हे प्रकरण घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पडळकर यांच्या समर्थकाचा जीव वाचवला असून, मुख्य आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे.