Gopinath Munde Anniversary: कागदावरची आकडेमोड कधी मैत्रीच्या आड आली नाही, किस्सा युतीचा

Gopinath Munde
Gopinath MundeSakal

आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस. म्हणजे लोकांना डिसेंबर महिन्यातील 12 तारीख म्हंटल की आठवण होते आपल्या लाडक्या नेत्यांच्या वाढदिवसाची. यातले एक म्हणजे शरद पवार तर दुसरे नेते गोपीनाथ मुंडे.

गोपीनाथ मुंडे हे भाजपचे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनतेवर पकड असणारे नेते. मातीशी नाळ जोडलेले आणि कष्टकरी, शेतकरी, ऊसतोड कामगारांसाठी अविरत झटणारे गोपीनाथ मुंडे यांची ८ वर्षांपूर्वी प्राणज्योत मालवली.

(Gopinath Munde Birth Anniversary special article)

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप - सेना युती तुटली तेव्हा गोपीनाथ मुंडे यांची उणीव सर्वांना जाणवली. मुंडेंनी युती अभेद्य राखण्यात मोठी भूमिका बजावली होती.

राजकरणात वेळ काळ बघुन प्रसंगी माघार घेणे सुद्धा त्यांना जमायचं म्हणूनच इतर पक्षांतील नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मुंडेंच्या अशाच स्वभावामुळे संभाजीनगर (औरंगाबादचं ) महापौरपद भाजपला मिळालं होतं.

तर मुंडे महाजन या जोडगळीने महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोवले आणि भारतीय जनता पक्षाचा राज्यभर वटवृक्ष करण्याचं काम केलं. गोपीनाथ मुंडे यांनी भाजप पक्ष चांदया पासून बांध्यापर्यंत पोहचवला व घरा-घरात भाजपचा कार्यकर्ता बनविला व पक्षाचा वटवृक्ष वृध्दिंगत केला.

Gopinath Munde
गोव्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'या' दिवंगत नेत्याचं नाव, PM मोदींनी केलं उद्घाटन; जाणून घ्या खासियत

भाजपवर ब्राह्मणांचा पक्ष असा ठप्पा बसला होता, पण तो मुंडेंच्या नेतृत्वामुळे पुसला गेला. भाजपला बहुजनांशी जोडायचं काम मुंडेंनी केलं आणि त्यामुळेच भाजपला राज्यात आपलं स्थान आणखी बळकट करता आलं. या सगळ्यातूनच १९९५ मध्ये भाजप सेना राज्यात सत्तेवर आले आणि त्या सरकारमध्ये मुंडे राज्याचे गृहमंत्री झाले.

पाहिले प्रमोद महाजन आणि त्यानंतर मुंडे हे भाजप सेनेच्या युतीमधला दुवा होते. दोन्ही पक्षामध्ये तणाव निर्माण झाला, तर ते शांत करण्याचं काम साहेब करायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते, बाळासाहेबांचा कुठलाही शब्द ते पडू द्यायचे नाहीत.

उद्धव ठाकरेंनी एका सभेदरम्यान दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची एक आठवण सांगितली. उद्धव ठाकरे म्हणाले, "संभाजीनगरच्या विषयी एकदा गोपीनाथ मुंडे घरी आले होते. तेव्हा ते यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना महापौर पद आम्हाला द्या, अशी मागणी केली. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी एका क्षणात होकार दिला. ते कागदावर आकडेमोड करत बसले नाहीत, की आमचे नगरसेवक किती तुमचे नगरसेवक किती वगैरे, एका क्षणात म्हणाले की, महापौर पद दिलं." मुंडेंच्या या मनमिळाऊ स्वभावामुळे युतीला महायुतीचं स्वरूप प्राप्त झालं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com