

Marathi Mandatory to Maharashtra Drivers
ESakal
मुंबई : राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी सुसंवाद साधण्यासाठी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करत महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४, ७८ आणि ८५ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत वाहनचालकांसाठी मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान (वर्किंग नॉलेज) अनिवार्य करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.