RTE Admission New Role
ESakal
महाराष्ट्र बातम्या
RTE Admission: आधी पैसे द्या, मग प्रवेश! संस्थाचालकांच्या भूमिकेमुळे आरटीई प्रवेशाचा गुंता वाढणार
RTE Admission New Role : आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असतानाच संस्थाचालकांनी नवी भूमिका हाती घेतली आहे. यामुळे आरटीई प्रवेशाचा गुंता वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असतानाच मुंबईसह राज्यातील खाजगी शाळा, संस्थाचालकांनी मात्र या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यापूर्वी सरकारने आरटीई प्रवेशासाठी सरकारकडून देण्यात येणाऱ्या शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम अगोदर आमच्या खात्यात अदा करावी आणि त्यानंतरच ही प्रवेश प्रक्रिया आमच्यावर लादावी, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरामध्ये आरटीई प्रवेशाचा गुंता वाढण्याची शक्यता आहे.

