

Government Develop Ports
ESakal
मुंबई : राज्यातील विविध स्वतःच्या समुद्रकिनाऱ्यांवर मालकीची बंदरे उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. "पहिल्या टप्प्यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा चार ठिकाणी ही बंदरे विकसित करण्यात येतील. या बंदरांची मालकी शंभर टक्के राज्य सरकारकडे असेल. या माध्यमातून ६ ते १० हजार कोटींचे उत्पन्न राज्य सरकारला मिळू शकेल," अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.