सरकारी कर्मचाऱ्यांचा उद्यापासून तीन दिवसांचा संप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

समन्वय समिती संघटनांच्या बैठकीत हा निर्णय झाला. जवळपास 17 लाख कर्मचारी संपावर जाणार आहेत. यात मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश असेल.

मुंबई - महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम आहेत. उद्यापासून (ता. 7 ते 9 ऑगस्ट) तीन दिवसांच्या संपावर राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचारी जाणार आहे. 

समन्वय समिती संघटनांच्या बैठकीत हा निर्णय झाला. जवळपास 17 लाख कर्मचारी संपावर जाणार आहेत. यात मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश असेल. या संपाच्यावेळी मंत्रालयाच्या तीनही गेटला टाळे लावणार, असे कर्मचारी कार्यकर्ता नंदू काटकर यांनी सांगितले आहे. 

सातवा वेतन आयोग, थकीत महागाई भत्ता, कर्मचारी भरती, महिला कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे रजा, अनुकंपा नियम दुरुस्ती, अंशदायी पेन्शन योजना रद्द करणे, आरोग्य खात्यातील परिचरांना किमान वेतन, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी हा संप असेल अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटनचे सातारा जिल्हाप्रमुख विनोद नलवडे आणि सचिव महेंद्र गोसावी यांनी पत्रकार परिषदेत यापुर्वी दिली होती. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government Employees Will Go On Strike From Tomorrow