CM Devendra Fadnavis
मुंबई - एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये राज्यात नवीन दोन ३९९ उपचारांना सोमवारी मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाच लाखांपेक्षा जास्त रकमेच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारांसाठी राखीव निधी (कॉर्पस फंड) निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आली.