वाडिया रुग्णालयासाठी शासनाकडून 24 कोटी रुपये अनुदान जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

  • वाडिया रुग्णालयासाठी शासनाकडून  24 कोटी रुपये अनुदान
  • आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : वाडिया मॅटर्नीटी रुग्णालयासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत 24 कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावास आज वित्त विभागाने मान्यता दिली. त्यानुसार  हे अनुदान वाडिया रुग्णालयास उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात बैठक घेतली होती. बैठकीत वाडिया रुग्णालयास आरोग्य विभागामार्फत 24 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आरोग्यमंत्र्यानी कालच विभागाच्या अधिकाऱ्यांना अनुदान वितरित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.

शिवेंद्रराजेंच्या फेसबुकपेजवरील पवारांचा उल्लेख बदलला

विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास आज वित्त विभागाने मान्यता दिली. त्यानुसार आज सायंकाळी वित्त विभागाने त्याबाबतचे मंजुरी आदेश निर्गमित केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government has announced a grant of Rs 24 crore for Wadia Hospital