Dr. Narendra Jadhav
sakal
मुंबई - राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या डॉ. नरेंद्र जाधव समितीला सरकारने रद्द करावे, असा एकमताने ठराव राज्य सरकारच्या भाषा सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या ठरावाची प्रत समितीकडून सरकारला लवकरच सादर केली जाणार असल्याची माहिती राज्य भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली.