esakal | सरकारी यंत्रणेला कोरोनाचा संसर्ग आवरेना; रुग्णालयांत सुविधांची वानवा!
sakal

बोलून बातमी शोधा

The government system was not infected

जम्बो हॉस्टिपल, कोविड सेंटर, स्वॅब तपासणी, प्रयोगशाळा असे अनेकविध शब्द कानी पडत असले तरी ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटर सुविधांनीयुक्त बेड तसेच आयसीयू यांची महानगरांसह अन्य जिल्ह्यांच्या ठिकाणी वानवाच आहे. अनेकदा गंभीर रुग्णांना तशा सुविधांसाठी ताटकळत राहावे लागत असल्याचे चित्र आहे

सरकारी यंत्रणेला कोरोनाचा संसर्ग आवरेना; रुग्णालयांत सुविधांची वानवा!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा संसर्ग नियंत्रण ठेवण्यात राज्यातील यंत्रणेला शंभर दिवसांनंतरही म्हणावे तसे यश मिळालेले दिसत नाही. मुंबईतील संसर्ग वाढीला ब्रेक लागला असला तरी पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांतील संसर्गाचा वाढता प्रकोप काळजाचा ठोका चुकवत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जम्बो हॉस्टिपल, कोविड सेंटर, स्वॅब तपासणी, प्रयोगशाळा असे अनेकविध शब्द कानी पडत असले तरी ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटर सुविधांनीयुक्त बेड तसेच आयसीयू यांची महानगरांसह अन्य जिल्ह्यांच्या ठिकाणी वानवाच आहे. अनेकदा गंभीर रुग्णांना तशा सुविधांसाठी ताटकळत राहावे लागत असल्याचे चित्र आहे

मुंबईमध्ये रुग्णवाढीचा वेग सध्या कमी झाला असला तरी आता सुविधांची व्याप्ती वाढविल्याने तेथील बेड काही प्रमाणात रिक्त आहेत, मात्र रुग्ण येण्याचे प्रमाण थांबलेले नाही. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये तसेच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत कोरोनाचा फैलाव वेगाने होत असला तरी सुविधा, उपचार मिळत आहेत. खासगी सुविधाही आहेत. मात्र, अत्यवस्थ, गंभीर रुग्णांना तातडीच्या सुविधांसाठी, उपचारांसाठी प्रतीक्षा करावी लागते. औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे, तेथेही अत्यवस्थ रुग्णांना बेड उपलब्ध न झाल्याने त्यांना रुग्णवाहिकेत ताटकळत ठेवावे लागते. कधीकधी त्यांच्यावर तिथेच उपचार करावे लागतात.

Breaking : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; १२ सप्टेंबरपासून धावणार विशेष रेल्वेगाड्या!​

उपराजधानी नागपुरात रुग्णवाढीला हवा तसा लगाम बसलेला नाही. जम्बो उपचार केंद्राची पावसाने वाताहत झाली आहे. सरकारी रुग्णालये आणि इतर केंद्रांवरही मोठा ताण आहे. एवढ्या मोठ्या शहरात ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर या सुविधांच्या बेडची संख्या मर्यादित आहे. सर्व यंत्रणांतील समन्वयाअभावी रुग्णांना नेमके काय करावे? याबाबत तात्काळ मार्गदर्शन मिळण्यात अडचणी येत आहेत.

प्रतीक्षा नशिबी
साताऱ्यात तीनशे ते आठशे हा रुग्णसंख्येचा दैनंदिन टप्पा वेगाने गाठला गेला. सरकारी सेवेव्यतिरिक्त खासगी सेवादेखील मर्यादित आहेत. आयसीयू कक्ष हाऊसफुल्ल आहेत. त्यामुळे रुग्ण अत्यवस्थ झाल्यास आयसीयूमधील आधीच्या बेडवरील रुग्णाची जागा कधी मोकळी होती? याची प्रतीक्षा अन्य रुग्णांना करावी लागते. जम्बो रुग्णालयाची घोषणा झाली तरी त्याचे काम संथगतीने सुरू आहे. वाढत्या रुग्णसंख्येला रोखणे आणि मृत्यूदर घटविण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर आहे.

सांगलीत यंत्रणेवर ताण
शेजारील सांगलीत वेगाने रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात रुग्ण आढळत असल्याने यंत्रणेवर ताण येतो आहे. सांगली आणि मिरजेत उपचारासाठी सुविधा आहेत. कोल्हापुरात यंत्रणेतील समन्वयाने रुग्णसंख्या नियंत्रणात राखली गेली . जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही रुग्ण असून स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध आहेत. कोकणात प्रसार मर्यादित असला तरी यंत्रणा सज्ज आहे.

मास्क न घालणाऱ्या बहाद्दरांनो, आता पोलिस तुम्हाला लस टोचणार पण दंडाची!

सोलापूरने केली मात
सोलापूरने आपत्तीवर चांगली मात केल्याने तेथे शेजारील सातारा, पुणे, उस्मानाबाद, लातूरचे तसेच कर्नाटकातील गुलबर्गा, बिदर येथील रुग्ण उपचारासाठी येताहेत, ही समाधानाची बाब आहे. नगर जिल्ह्यात विशेषतः अन्य तालुक्‍यांच्या ठिकाणी रुग्ण झपाट्याने वाढले. तेथे मृत्यूदरावर नियंत्रण आणण्यात यंत्रणा यशस्वी ठरली. ज्या जळगावमध्ये रुग्णांची हेळसांड झाल्याने सुरुवातीला चर्चा झाली त्याच जिल्ह्यात कोरोनावर मात करणारे रुग्ण वाढत आहेत. मात्र मृत्यूदर कमी करण्याचे मोठे आव्हान आरोग्य सेवेसमोर आहे. 

loading image