राज्यात सरकार अनैसर्गिक - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

तालुक्‍यातील शेतकरी प्रगतशील असून प्रदर्शनातील आधुनिक ज्ञानामुळे शेतीमाल उत्पादकता वाढत आहे. शेतकऱ्यांनी निर्यातक्षम शेतीमाल उत्पादनावर भर देणे गरजेचे आहे.
- हर्षवर्धन पाटील, माजी सहकारमंत्री

इंदापूर - ‘राज्यात स्थापन झालेले सरकार अनैसर्गिक असून, सत्तेवर येऊनदेखील चाचपडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची फसवी घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा,’’ असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित केलेल्या ‘कृषी महोत्सव : २०२०’च्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. या अंतर्गत कृषी, जनावरे प्रदर्शन, घोडेबाजार व डॉग शोचे आयोजन केले आहे. अध्यक्षस्थानी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘हे प्रदर्शन गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. प्रदर्शनातील घोडे बाजारामुळे बाजार समितीचा नावलौकिक वाढला आहे.’’माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, सभापती अप्पासाहेब जगदाळे, पंचायत समितीच्या सभापती पुष्पाताई रेडके, मदनसिंह मोहिते पाटील, मयूरसिंह पाटील, पृथ्वीराज जाचक, उदयसिंह पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. सचिन भाग्यवंत यांनी आभार मानले.

पुणे : विद्यापीठाच्या कारभाराचे गाऱ्हाणे कुलपतींच्या कानावर (व्हिडिओ)

पाटील यांना वाऱ्यावर सोडणार नाही
विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा कमी मतांनी पराभव झाला. त्यांचा राजकीय अनुभव पाहता त्यांना व रणजितसिंह मोहिते-पाटील यांना राज्यात काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी अप्पासाहेब जगदाळे यांनी केली होती. त्याचा धागा पकडून त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नसल्याचे सूतोवाच चंद्रकांत पाटील यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government unnatural in the state chandrakant patil