Eknath Shinde: अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ? 'त्या' व्यक्तव्याबद्दल राज्यपालांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

Eknath Shinde: अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ? 'त्या' व्यक्तव्याबद्दल राज्यपालांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अलीकडेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं होतं. अब्दुल सत्तार यांना पदावरून काढण्याची मागणी झाली होती. त्यांच्या शासकीय निवासस्थानाची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर प्रकरण आणखी पेटलं होतं. मात्र या प्रकरणाची दखल थेट राज्यपालांनी घेतली असून कार्यवाहीसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे.

या संदर्भात माहिती राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनी दिली आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांच्याबाबत मुख्यमंत्री शिंदे काय निर्णय घेणार? याकडे सर्वांच लक्ष्य असणार आहे. दरम्यान सत्तारांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पत्राद्वारे निवेदन दिलं होतं.

हे ही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या या निवेदनाची राज्यपालांनी दखल घेतली असून त्यासंबधी पत्र पुढील कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. राज्यपालांनी पाठवलेल्या निवेदनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार? अब्दुल सत्तार यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार? याकडे राज्याचं लक्ष लागून आहे.