डिस्चार्ज मिळताच राज्यपाल कोश्यारी ॲक्टिव्ह, शिंदेंसाठी थेट गृह खात्याला पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भगतसिंग कोश्यारी

शिंदे गटातील आमदारांना आजच सुरक्षा द्या अशा आशयाचे हे पत्र राज्यपाल यांनी गृह खात्याला पाठवलं आहे

डिस्चार्ज मिळताच राज्यपाल कोश्यारी ॲक्टिव्ह, शिंदेंसाठी थेट गृह खात्याला पत्र

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आमदारांना सोबत घेऊन सेनेविरोधात बंड पुकारल्यामुळे सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने आमदारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, केंद्रापाठोपाठ आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईचे डीजीपी आणि पोलिस आयुक्तांना पत्र लिहलं आहे. शिंदे गटातील आमदारांना आजच सुरक्षा द्या, अशा आशयाचे हे पत्र आहे.

हेही वाचा: शिवसेनेला आणखी एक धक्का, मंत्री उदय सामंत शिंदे गटात सामील

शिंदे गटातील आमदारांना आजच सुरक्षा द्या, असे एक पत्र राज्यपाल कोश्यारी यांनी गृह खात्याला लिहले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. डिस्चार्ज मिळताच राज्यपालांनी घरी येताच तातडीने हा निर्णय घेतला आहे. या पत्राची एक कॉपी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे आणि महाराष्ट्राचे डीजीपी यांना पाठवण्यात आले आहे. गुवाहाटी येथे असणाऱ्या सर्व आमदारांना सुरक्षतितेची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, काही वेळापूर्वी शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याची माहिती मिळली होती. आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आलं आहे. बंडखोर आमदारांविरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे केंद्राने त्यांना संरक्षण पुरवले होते. आता राज्यपालांनीही एक पत्र मुंबई पोलिसांना लिहले आहे.

हेही वाचा: Ranji Trophy Final : मध्य प्रदेशने मुंबईला हरवून रचला इतिहास

Web Title: Governor Bhagat Singh Koshyari Write A Letter To Mumbai Djp Pi For Mla Security Provide

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..