शिवसेनेला आणखी एक धक्का, मंत्री उदय सामंत शिंदे गटात सामील

Possibility of joining Uday Samant Shind group
Possibility of joining Uday Samant Shind groupPossibility of joining Uday Samant Shind group

मुंबई : कोकणातील शिवसेनेचे प्रमुख नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. उदय सामंत हे रविवारी गुवाहाटीसाठी रवाना झाले होते. चार्टड विमानाच्या लिस्टमध्ये सामंत यांचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. तसेच त्यांचा फोन नॉट रिचेबल येत होता. शिंदे गटात सहभागी होणारे सामंत हे आठवे मंत्री आहेत. (Possibility of joining Uday Samant Shind group)

कोकणातील शिवसेनेचे प्रमुख नेते उदय सामंत (Uday Samant) यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात कुतूहल असतानाच रविवारी (ता. २६) त्यांचा फोन नॉट रिचेबल येत होता. त्यांच्याशी अनेकदा दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, संपर्क होऊ शकत नव्हता. त्यांच्या काही समर्थकांमध्ये उदय सामंत गुवाहटीला पोहोचल्याची चर्चा सुरू होती. आता ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याची माहिती आहे.

राज्यात राजकीय घडामोडी सुरू असताना मंत्री उदय सामंत (Uday Samant) शिवसेनेच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहत होते. शुक्रवारी (ता. २४) पाली येथील निवासस्थानी मंत्री उदय सामंत यांनी दिवसभर पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी सल्लामसलत केली. कुटुंबीयांशीही चर्चा केली. या चर्चेतील प्रतिसादाचा अंदाज घेऊन सामंत लवकरच भावी राजकीय दिशा ठरवतील, असा अंदाज मांडला जात होता.

Possibility of joining Uday Samant Shind group
आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट; शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती

पत्रकारांशी बोलतानाही सामंत यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बाजू समजून घेण्याची गरज असल्याचे मत वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे उदय सामंत नक्की कुठे जाणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. अशात शनिवारी (ता. २५) मुंबईत मातोश्रीवर झालेल्या बैठकीलाही उपस्थित राहिले होते. त्यामुळे सामंत जाणार की नाही याबाबत संभ्रम होता.

सुरत मार्गे रवाना झाल्याची चर्चा

मात्र, ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. रविवारी दुपारी सोशल मीडियावर सामंत गुवाहटीला रवाना झाल्याचे समजले आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला. यामुळे रत्नागिरीसह जिल्ह्यात चर्चांना उधाण आले होते. एका व्हॉटअप ग्रुपवर ते सुरत मार्गे रवाना झाल्याचीही चर्चा होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com