Govind Pansare: गोविंद पानसरेंच्या हत्येनंतर 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकात बदल?

२०१५च्या आवृत्तीत असलेले उल्लेख २०१९च्या आवृत्तीत बदलण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
Shivaji Kon Hota - Book
Shivaji Kon Hota - BookSakal
Updated on

गोविंद पानसरे यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकात बदल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. २०१५मधील आवृत्तीमधील काही मजकूर २०१९च्या आवृत्तीमधून वगळण्यात आल्याचं सांगण्यात येत असून सावरकरवादी मधुसूदन चेरेकर यांनी याबाबत फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे.

(Govind Pansare Book Controversy)

दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते असा उल्लेख २०१९ च्या आवृत्तीतून काढण्यात आला आहे. तर फक्त कारभारी असा उल्लेख या आवृत्तीत करण्यात आला आहे. दरम्यान मोरोपंत पिंगळे यांचा पेशवे असा उल्लेखही वगळण्याच आल्याचा आरोप चेरेकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून केला आहे. त्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

दरम्यान, रामदासाने शिवाजीला उपदेश आणि मार्गदर्शन केले यावर कडाक्याचे वाद आहेत असा २०१५च्या आवृत्तीत असलेला उल्लेख २०१९च्या आवृत्तीमधून वगळण्यात आला आहे. तर मोरोपंत पिंगळे हे पेशवे पदावर होते आणि एक मुख्य प्रधान होते असा २०१५च्या आवृत्तीत असलेला उल्लेख २०१९ च्या आवृत्तीतून कमी करत पिंगळे हे तर मुख्य प्रधान होते असा करण्यात आला आहे.

दरम्यान, २०१९मध्ये प्रकाशित झालेल्या आवृत्तीतील बदल हे गोविंद पानसरे यांच्या हयातीत २०१० मध्ये जयसिंगराव पवार यांच्याशी झालेल्या चर्चेत करण्यात आल्याचं स्पष्टीकरण गोविंद पानसरे यांच्या सून मेधा पानसरे यांनी दिलं आहे.

Shivaji Kon Hota - Book
भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चा; राष्ट्रवादीच्या बबन शिंदेंचे स्पष्टीकरण

काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर खोटा इतिहास लिहिल्याचा आरोप केल्यानंतर आता या नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यानंतर गोविंद पानसरे यांच्या सूनेने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com