
नवी दिल्ली : ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी पुढील तपासावरील देखरेख थांबविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने सोमवारी हा आदेश दिला.