

Technical Gridlock: New GPR Portal Paralyzes Issuance of Crucial Educational Certificates
सटाणा : दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेला वेग आला असतानाच राज्य शासनाच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या जीपीआर (GPR) प्रणालीमुळे हजारो विद्यार्थी आणि पालकांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवेशासाठी आवश्यक असलेले उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, अधिवास, रहिवासी, नॉन-क्रीमी लेयर व ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची ‘आपले सरकार’ व सेतू सुविधा केंद्रांवर गर्दी वाढली आहे. मात्र नव्या पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे अर्ज प्रक्रियाच ठप्प होत असल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी राहण्याची भीती व्यक्त होत आहे.