Gram Panchayat Election Result: निवडणुकांचा निकाल विरोधकांना त्यांची जागा दाखवणारा - CM शिंदे

शिंदे-फडणवीस सरकारनं ३ हजारांहून अधिक ग्रामपंचायतीत विजय मिळवला आहे.
fadnavis_shinde
fadnavis_shinde
Updated on

मुंबई : राज्यातील ७ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिंदे-फडणवीस सरकारनं घवघवीत यश मिळवलं आहे. यावरुन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील आमचा विजय हा विरोधकांना त्यांची जागा दाखवणारा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. (Gram Panchayat Election Result Showing Opposition to their place says CM Eknath Shinde)

fadnavis_shinde
Gram Panchayat Result: इंदुरीकर महाराजांच्या सासुबाई बनल्या सरपंच; कुठल्या पक्षाकडून मिळवला विजय? जाणून घ्या

CM शिंदे म्हणाले, "आजच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अतिशय घवघवीत आणि देदैप्यमान असं यश बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपयुतीला मिळालं आहे. त्यासाठी मी जनतेचं अभिनंदन करतो. या निवडणुकीत या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे तसेच आमचे सर्व आमदार, खासदार, मंत्री, कार्यकर्ते या सर्वांनी मेहनत घेतली त्यांचेही मी अभिनंदन करतो. गेल्या निवडणुकीनतंर दुप्पट विजय या निवडणुकीत मिळाला"

fadnavis_shinde
Sukesh Chandrashekhar: 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणाचं 'आप' कनेक्शन; सुकेश चंद्रशेखरनं केले गंभीर आरोप

विरोधीपक्षाचे लोक शेतकऱ्यांना काय दिलं? असं विचारत होते, त्याला हे चोख उत्तर आहे. हा विजय विरोधकांना त्यांची जागा दाखवणारा आहे तसेच गेल्या चार-पाच महिन्यांत युतीच्या आमच्या सरकारनं जे काम केलंय त्याची ही पोच पावती आहे. त्यामुळं आमच्या सरकारनं जे निर्णय घेतले ते लोकाभिमुख कामं आहेत.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

जनता आमच्या पाठिशी - फडणवीस

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपयुतीला दणदणीत विजय मिळाला आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार ३,०२९ एवढ्या ग्रामपंचायती आमच्या आल्या आहेत. महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये आमची सरशी झालेली आहे. त्यामुळं मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करेन. आमच्या सहा महिन्यांच्या कारभारावर ग्रामीण जनेतनं पसंती दाखवली आहे.

जे लोक आमच्या सरकारला नावं ठेवत होते आणि स्वतः अल्पमतात असताना आमच्या सरकारला अल्पमतात असल्याचं सांगत होते. यापूर्वी कोर्टानं सागिंतलं होतं त्यानतंर आता जनतेनं देखील सांगितलं आहे की, जनता याच सरकारच्या पाठीशी आहे. त्यामुळं मी महाराष्ट्रातील तमाम जनेतेचे आभार मानतो, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com