Amazon Sale: 10 हजार रुपयांत खरेदी करा स्मार्ट एलईडी टीव्ही, येथे पाहा बेस्ट ऑफर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

best smart tv under 10000 rupees in amazon big tv fest

Amazon Sale: 10 हजार रुपयांत खरेदी करा स्मार्ट एलईडी टीव्ही, येथे पाहा बेस्ट ऑफर्स

Amazon वर सुरू असलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलचे शेवटचे काही दिवस बाकी आहेत. अशा परिस्थितीत कंपनी यूजर्सना अनेक उत्तम ऑफर्स आणि बंपर डिस्काउंट देत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर जर तुम्ही नवीन एलईडी टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकतो.

ग्रेट इंडियन फेस्टिव्हलच्या बिग टीव्ही फेस्टमध्ये, तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत दमदार फीचर्स असलेले स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या सेलमध्ये 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत तुमचा कोणता टीव्ही खरेदी करता येईल ते पाहूया..

Redmi 32 inches Android 11 Series HD Ready Smart LED TV

रेडमीच्या या HD रेडी स्मार्ट एलईडी टीव्हीची MRP 24,999 रुपये आहे. सेलमध्ये, तुम्ही 56% च्या सवलतीनंतर 10,999 रुपयांना हा टीव्ही खरेदी करू शकता. ही ऑफर फक्त चार दिवसांसाठी वैध आहे. तुम्ही ICICI बँक क्रेडिट कार्डने EMI पर्यायामध्ये टीव्ही खरेदी केल्यास, तुम्हाला 1500 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त लाभ मिळू शकतो. टीव्हीमध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह 32-इंचाचा डिस्प्ले आहे. तसेच चांगल्या आवाजासाठी तुम्हाला त्यात डॉल्बी ऑडिओ देखील मिळेल.

हेही वाचा: Airtel Recharge Plan: मिळते 56 दिवसांची वैधता, दररोज 3GB डेटासह बरंच काही...

Acer 32 inches I Series HD Ready Android Smart LED TV AR32AR2841HDFL

हा टीव्ही 19,990 रुपयांच्या MRP सह विकाला जात आहे, तुम्ही हा TV सेलमध्ये 10,999 रुपयांच्या सवलतीच्या किंमतीत खरेदी करू शकता. आकर्षक बँक ऑफर मध्ये टीव्हीवर 1500 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट देखील मिळू शकते. यामध्ये, तुम्हाला 60Hz रिफ्रेश रेटसह HD रेडी डिस्प्लेसह 24W साउंड आउटपुट मिळेल. याशिवाय टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ देखील देण्यात आला आहे, ज्यामुळे त्याची आवाजाची गुणवत्ता आणखी सुधारते.

हेही वाचा: Diwali Shopping: कुठे मिळेल सर्वात स्वस्त 65 इंच स्मार्ट टीव्ही? पाहा Flipkart-Amazon वरील ५ ऑफर

AmazonBasics 32 inches HD Ready Smart LED Fire TV AB32E10SS

Amazon Basics मधील हा टीव्ही सेल आणि बँक ऑफरसह 27,999 रुपयांऐवजी फक्त 9,899 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. या टीव्हीमध्ये तुम्हाला 60Hz च्या रिफ्रेश रेटसह 32-इंचाचा HD रेडी डिस्प्ले मिळेल. मजबूत आवाजासाठी, कंपनी टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ आणि डीटीएस ट्रू साउंडसह 20W पावरफूल स्पीकर देत आहे.

टॅग्स :Diwali FestivalTechnology