ग्रामपंचायत निवडणुकीचा सर्व्हर डाउन ! उमेदवारी व जात पडताळणीसाठी ऑफलाइन करता येणार अर्ज 

तात्या लांडगे
Tuesday, 29 December 2020

ठळक बाबी... 

  • ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास इच्छूकांची मोठी गर्दी 
  • जात पडताळणीसाठी प्रस्ताव दाखल केल्याची पोहच मिळविण्यासाठीही वाढली गर्दी 
  • राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदरकर यांच्या निर्देशानुसार उमेदवारी अर्ज ऑफलाइन करता येणार 
  • जात पडताळणीसाठी ऑफलाइन अर्ज करण्यास उपायुक्‍त मेघराज भाते यांनी दिली परवानगी 
  • इच्छूकांच्या अर्जांची संख्या वाढल्याने सर्व्हर झाला डाऊन; नेट स्लो झाल्याने अडकले उमेदवारी अर्ज 

सोलापूर : राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 30 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे. 25 ते 27 डिसेंबरदरम्यान सार्वजनिक सुट्ट्या असल्याने आता उमेदवारांची गर्दी वाढली आहे. एका दिवसांत आज तीन लाख 32 हजार 884 उमेदवारांनी अर्ज केले असून इंटरनेटची गती कमी झाली आहे. दुसरीकडे सर्व्हर डाउन झाल्याने ऑनलाइन अर्ज सबमिट होण्यास अडचणी येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जात पडताणळीसाठी व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छूकांना ऑफलाइन अर्ज करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ठळक बाबी... 

  • ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास इच्छूकांची मोठी गर्दी 
  • जात पडताळणीसाठी प्रस्ताव दाखल केल्याची पोहच मिळविण्यासाठीही वाढली गर्दी 
  • राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदरकर यांच्या निर्देशानुसार उमेदवारी अर्ज ऑफलाइन करता येणार 
  • जात पडताळणीसाठी ऑफलाइन अर्ज करण्यास उपायुक्‍त मेघराज भाते यांनी दिली परवानगी 
  • इच्छूकांच्या अर्जांची संख्या वाढल्याने सर्व्हर झाला डाऊन; नेट स्लो झाल्याने अडकले उमेदवारी अर्ज 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छूकांना अर्ज करण्यास 30 डिसेंबरपर्यंत (दुपारी 4 वाजेपर्यंतच) वेळ देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे आता ही वेळ सांयकाळी पाचपर्यंत वाढविण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज व घोषणापत्रांचे कोरे नमुने इच्छूक उमेदवारांना उपलब्ध होईल. पारंपारिक पध्दतीने स्वीकारलेले उमेदवारी अर्ज संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध उमेदवारी अर्ज संगणक चालकांच्या मदतीने ऑनलाइन भरावेत, अशा सूचनाही राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी दिल्या आहेत. दुसरीकडे जात पडताळणीसाठी ऑफलाइन अर्ज करण्यास 30 डिसेंबरपर्यंत परवानगी असेल, असेही जात पडताळणी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. ऑफलाइन अर्ज करताना इच्छूकांनी कोरोनासंबंधीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat Election Server Down! Application for candidature and caste verification can be done offline