Grampanchayat Election: राज्यातील 547 ग्रामपंचायतीचा आज 'गुलाल'

Grampanchayat
GrampanchayatSakal

मुंबई : राज्यातील तब्बल ५४७ ग्रामपंचायतींचा निकाल आज लागणार आहे. या निवडणुकांसाठी रविवारी मतदान पार पडले होते. राज्यातील तब्बल ६०८ पैकी ५४७ ग्रामपंचायतीसाठी ७६ टक्के मतदान झालं आहे. तर ६०८ पैकी ६१ जागांवर सरपंचाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

(Grampanchayat Election Result Latest Updates)

राज्यात सत्तांतरानंतर ही पहिलीच निवडणूक असून १६ जिल्ह्यांतील तब्बल ६०८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी मतदान काल पार पडले. त्यामध्ये ६१ ग्रामपंचायतींवर सरपंचाची बिनविरोध निवड करण्यात आली असून ५४७ ग्रामपंतायतीसाठी मतदान पार पडले. तर आज या निवडणुकांचा गुलाल उधळणार आहे.

Grampanchayat
Devendra Fadnavis : निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात ट्रान्सफॉर्मेशन इन्स्टिट्युट तयार करणार

सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतल्यावर निवडणूक आयोगाने १२ ऑगस्ट रोजी राज्यातील ६०८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानंतर ६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. तर उर्वरित ५४७ ग्रामपंचायतीसाठी काल मतदान पार पडले. तर आज मतमोजणी पार पडणार आहे.

थेट जनतेतून निवडला जाणार सरपंच

राज्यात सत्तांतरानंतर नव्या सरकराने थेट जनतेतून सरपंच निवडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर, त्या निर्णयानुसार पहिल्यांदा राज्यात निवडणुका पार पडणार असून राज्यातील ५४७ ग्रामपंचायतीवर थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com