द्राक्ष, भाताला अवकाळीचा फटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

पुणे - राज्याच्या बहुतांश भागांत काल व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात काल व आज पावसाने हजेरी लावली. या पावसाचा मुख्य फटका द्राक्षबागांना बसला आहे, तर काढणीला आलेल्या भाताचेही नुकसान झाले. मराठवाड्याच्या काही भागांत काढणी कापूस भिजला आहे. अनेक भागांत ऊसतोड खोळंबली आहे. कोकणात काजू मोहर काळा पडला असून, आंब्याच्या मोहराची गळ झाली आहे. 

मराठवाड्यातील केज, अंबाजोगाई, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड तसेच उस्मानाबाद, पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर, पश्‍चिम महाराष्ट्रातील संगमनेर, शेवगाव आणि नेवासे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि खानदेशातील धुळे या जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपले. या पावसामुळे वाढीच्या टप्प्यातील उसाला फायदा होणार असून, खरिपाच्या तुरीच्या फुलोऱ्याला झटका बसला, तरी शेंगांना फायदा होणार आहे. रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, भाजीपाला, हळद या पिकांना एक संरक्षित पाणी दिल्यासा दिलासाही या पावसाने दिला. 

द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेल्या सांगली आणि नाशिक जिल्ह्यातील बागांचे मालक मात्र या पावसामुळे धास्तावले आहेत.सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांत अवकाळीचा फटका बसला. खटाव आणि माणच्या पूर्व भागातही पावसाने हजेरी लावली. या पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाले, मात्र रब्बी पिकांना जीवदान मिळाले. कोल्हापूरमध्ये पावसाने ऊसतोडी थांबल्या. रत्नागिरीसह जिल्ह्यातील संगमेश्‍वरला पावसाने जोरदार हजेरी लावली, तर चिपळूण, राजापूर, लांजा भागात हलका पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी आणि देवगडमध्ये मुसळधार पाऊस झाला. नाशिक, दिंडोरी व निफाड तालुक्‍यांतील द्राक्षबागा अवकाळीमुळे संकटात आल्या आहेत.  सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी पहाटेपासून दुपारी चारपर्यंत विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.

पावसाचे परिणाम...
    काढणीस आलेल्या खरिपाच्या पिकांचे नुकसान
    ऊसताेडणी व वाहतूक, गुऱ्हाळांवर परिणाम
    फळबागांसह द्राक्ष बागायतदारांच्या चिंता वाढल्या
    रब्बी पिकांसाठी पाऊस ठरणार उपयुक्त

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grapes Rice Loss by rain