किराणा दुकानदाराने ओढला अल्पवयीन मुलीचा हात! दुकानाजवळ कोणी नसल्याचे पाहून दोनवेळा जवळ घेऊन दाखविले मोबाईलमधील अश्लिल व्हिडिओ अन्‌ पुढे...

वही, पेन, वेफर्स आणायला गेल्यावर प्रत्येकवेळी हात ओढून, जवळ घेऊन, मोबाईलमधील अश्लिल व्हिडिओ दाखवून किराणा दुकानदारानेच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना न्यु बापूजी नगरात घडली आहे. त्या किराणा दुकानदाराविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
 A young man has been aPOCSO charges. Police are investigating the case.
A young man has been aPOCSO charges. Police are investigating the case.Sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : वही, पेन, वेफर्स आणायला गेल्यावर प्रत्येकवेळी हात ओढून, जवळ घेऊन, मोबाईलमधील अश्लिल व्हिडिओ दाखवून किराणा दुकानदारानेच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना न्यु बापूजी नगरात घडली आहे. त्या किराणा दुकानदाराविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून मंगळवारी (ता. २) न्यायालयात हजर केले होते.

न्यू बापूजी नगर परिसरातील एक अल्पवयीन मुलगी ९ जून रोजी रात्री आठच्या सुमारास किराणा दुकानातून वेफर्स आणायला गेली होती. त्यावेळी तेथे कोणी नसल्याची संधी साधून त्याने तिचा हात धरून जवळ ओढले. किराणा दुकानदाराचे कृत्य धक्कादायक होते, त्याला घाबरून ती गप्प बसली. दोन महिन्यांनी म्हणजेच २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेसातच्या सुमारास ती अल्पवयीन मुलगी घरातून किराणा दुकानाला वही आणायला गेली होती. त्यावेळी देखील त्या किराणा दुकानदाराने तिला जवळ ओढून घेतले आणि मोबाईलमधील अश्लिल व्हिडिओ तिला दाखविले. ही बाब देखील तिने घरी सांगितली नव्हती.

३१ ऑगस्ट रोजी ती अल्पवयीन मुलगी रात्री साडेआठच्या सुमारास किराणा दुकानाला गेली होती. त्यावेळी दुकानाजवळ कोणी नसल्याचे पाहून दुकानदाराने अल्पवयीन मुलीला जवळ ओढले. तिच्या छातीवरून हात फिरविला व जवळ घेतले. खिशातील मोबाईल काढून दुकानदाराने त्यातील अश्लिल व्हिडिओ पुन्हा दाखविले. घाबरलेल्या मुलीने ही बाब घरी सांगितली.

पीडितेच्या आईची पोलिसांत धाव

पीडितेच्या आईने पोलिसांत धाव घेतली. सहायक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर यांच्यासह सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, दुय्यम पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांनी पीडितेच्या घरी भेट दिली. पोलिसांनी संशयित आरोपी स्वप्निल गुड्डूर याला अटक केली असून न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी ठोठावली आहे. सदर बझार पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com