'मुख्यमंत्री साहेब इथं थोडा भेदभाव होतो, तुम्हीच काय ते खरं सांगा'

Uddhav Thackeray Ajit Pawar
Uddhav Thackeray Ajit Pawaresakal
Summary

सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मतभेद सुरू आहेत.

सध्या शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यात मतभेद सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेचा विषय ठरलंय. मुख्यमंत्री साहेब इथं थोडा भेदभाव होतो. तुम्ही मराठी भाषा भवनाच्या कार्यक्रमाला येता. मात्र, आमच्या विभागाच्या कार्यक्रमाला येत नाहीत. त्यामुळं मतभेदाच्या बातम्या येतात. त्यामुळं तुम्हीच काय ते खरं सांगा, असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. जीएसटी भवनच्या (GST Bhavan) भूमिपूजन कार्यक्रमात अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) ऑनलाइन कार्यक्रमाला उपस्थित होते. परंतु, अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगलीय.

सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मतभेद सुरू आहेत आणि अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं हे उपरोधिक वक्तव्य चांगलंच चर्चेचा विषय ठरलंय. उपमुख्यमंत्री पवारांनी म्हंटलं की, मुख्यमंत्री आमच्या खात्याच्या कार्यक्रमाला येत नाहीत. त्यामुळं मतभेद असल्याच्या बातम्या येत असतात.

Uddhav Thackeray Ajit Pawar
मोदींचं 'गुजरात' जिंकण्यासाठी काँग्रेस मोठा डाव खेळणार!

जीएसटी भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात अजित पवार यांनी म्हंटलंय की, जीएसटी भवन भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या साक्षीनं झाला आहे. मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे सर्व निर्बंध हटवून ही भेट दिलीय. मागील काळात आम्ही सत्तेत असताना आम्हाला ही वास्तू उभारायची होती. मागील सरकारनं खरं तर हे काम पुढं घेऊन जायला हवा होतं. मात्र, आता महाविकास आघाडी सरकारनं हे काम हाती घेतलंय, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com