मुख्यमंत्री बोम्मईंची गुगली; पालकमंत्रीपदी कारजोळांची वर्णी

मुख्यमंत्री बोम्मई यांच्या मंत्रिमंडळात 29 जणांचा समावेश
मुख्यमंत्री बोम्मईंची गुगली; पालकमंत्रीपदी कारजोळांची वर्णी

बेळगाव : बेळगावला (Belgaum) पुन्हा एकदा परजिल्ह्याचा पालकमंत्री लाभला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Chief Minister Basavaraj Bommai) यांनी ही जबाबदारी पुन्हा मंत्री गोविंद कारजोळ (Govind Karjol)यांच्याकडे सोपवली आहे. मात्र, जिल्ह्यात दोन मंत्री असताना परजिल्ह्यातील मंत्र्यांकडे बेळगावची जबाबदारी का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

Summary

बेळगावला परजिल्ह्याचा पालकमंत्री गोविंद कारजोळांकडे जबाबदारी ; स्पर्धा नसूनही उमेश कत्तींना डावलले

मुख्यमंत्री बोम्मई यांच्या मंत्रिमंडळात २९ जणांचा समावेश आहे. त्यात बेळगाव जिल्ह्यातील उमेश कत्ती व शशिकला जोल्ले (Umesh Katti,Shashikala Jolle) यांचा समावेश आहे. या दोघांपैकी एकाकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी येईल, असे वाटत होते. आठवेळा आमदार झालेल्या व मंत्रीपदाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या कत्ती यांना हमखास पालकमंत्रीपद मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या दोघांना डावलून माजी पालकमंत्री कारजोळ यांच्यावर विश्‍वास दाखविला आहे.स्थानिकाऐवजी परजिल्ह्यातील मंत्र्यांकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्याचा हा प्रकार सलग दुसऱ्यांदा घडल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री बोम्मईंची गुगली; पालकमंत्रीपदी कारजोळांची वर्णी
‘एफआरपी’ प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात लक्ष्मण सवदी, रमेश जारकीहोळी, श्रीमंत पाटील, उमेश कत्ती, शशिकला असे पाच मंत्री होते. त्यावेळी जारकीहोळी यांच्याकडे पालकमंत्रीपद होते. त्यांचे मंत्रीपद गेल्यानंतर पालकमंत्रीपद कुणाकडे सोपवायचे असा प्रश्‍न निर्माण झाला. पालकमंत्रीपदावरुन मतभेद निर्माण होऊ शकतात, हे गृहित धरुन ज्येष्ठ मंत्री कारजोळ यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. पण, यावेळी दोनच मंत्री असल्याने स्पर्धा कमी होती. त्यामधील कत्ती वरिष्ठ व अनुभवी असल्यामुळे त्यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येईल, असे मानले जात होते. परंतु, बोम्मई यांनी परत गुगली टाकत कारजोळ यांना पालकमंत्री म्हणून घोषित केले आहे.

कत्ती बागलकोट तर जोल्ले विजापूरच्या पालकमंत्री

राज्यात नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरु झाल्यानंतर आमदार उमेश कत्ती यांनी मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला होता. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यास नक्की सांभाळू शकतो, असे म्हटले होते. पण, त्यांना मंत्रीपद मिळाले आहे. त्यांच्याकडे बागलकोट जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर शशिकला जोल्ले विजापूरच्या पालकमंत्री असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com