Ajit Pawar : अजित पवारांना पुणं मिळालं पण रायगडचं काय? साताऱ्यासह नाशिकचा तिढा का सुटला नाही?

Eknath Shinde Ajit Pawar
Eknath Shinde Ajit Pawaresakal
Updated on

मुंबईः उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याचं कालपासून चर्चिलं जात आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले होते. पवारांची नाराजी फळाला आलेली असून राज्यातील १२ जिल्ह्यांना नवीन पालकमंत्री मिळाले आहे.

अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. त्याबदल्यात विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. एकीकडे अजित पवारांना पुणं मिळालेलं असलं तरी रायगड, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांचा तिढा सुटलेला नाही.

Eknath Shinde Ajit Pawar
धक्कादायक! स्वातंत्र्य सैनिकाच्या घराला करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न; सांगलीतील क्रूर प्रकाराने खळबळ

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी आदिती तटकरे यांचं नाव राष्ट्रवादीकडून पुढे करण्यात आलेलं होतं. परंतु त्याबाबत सरकारने निर्णय घेतला नाही. अजित पवार आमदारांना घेऊन आलेही आणि मंत्रीपदं घेऊन पालकमंत्री पदंही घेतली. परंतु शिवसेनेचे प्रतोद भरतशेठ गोगावले यांच्यामागचं शुक्लकाष्ठ मिटत नाहीये.

रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय सरकारने घेतला नसल्याचं त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. रायगड नसेल तर रत्नागिरी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं, अशीही राष्ट्रवादीने भूमिका घेतली होती. मात्र दोन्ही जिल्ह्यांमध्ये निर्णय घेतला गेला नाही.

Eknath Shinde Ajit Pawar
Ajit Pawar : पालकमंत्रीपदांचा तिढा सुटला! पुण्याचे कारभारी अजितदादाच; तर चंद्रकांत पाटील...

दुसरीकडे सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबतसुद्धा निर्णय घेतला नाही. शिवेंद्रराजे भोसले की शंभूराज देसाई? हा तिढा सत्ताधाऱ्यांना सोडवता आलेला नसल्याने जैसे थे परिस्थिती ठेवण्यात आलेली आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी छगन भुजबळांसाठी आग्रही होती. मात्र तिथेही निर्णय झालेला नाही.

१२ जिल्ह्यांचे पालकमंत्री

  • पुणे - अजित पवार

  • अकोला - राधाकृष्ण विखे- पाटील

  • सोलापूर - चंद्रकांत पाटील

  • अमरावती - चंद्रकांत पाटील

  • वर्धा - सुधीर मुनगंटीवार

  • भंडारा - विजयकुमार गावित

  • बुलढाणा - दिलीप वळसे-पाटील

  • कोल्हापूर - हसन मुश्रीफ

  • गोंदिया - धर्मरावबाबा आत्राम

  • बीड - धनंजय मुंडे

  • परभणी - संजय बनसोडे

  • नंदूरबार - अनिल भा. पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com