Guhagar-Vijaypur highway accident : गुहागर-विजयपूर महामार्गावर तामखडी नजीक भीषण अपघात; एक जण ठार तर सहाजण जखमी

Fatal Accident on Guhagar–Vijaypur Highway Near Tamakhadi : अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती, की वाहनांचा अक्षरशा चुराडा झाला.
Visuals from the accident site near Tamakhadi on the Guhagar–Vijaypur highway showing damaged vehicles and emergency response efforts.

Visuals from the accident site near Tamakhadi on the Guhagar–Vijaypur highway showing damaged vehicles and emergency response efforts.

esakal

Updated on

Latest Maharashtra Road Accident Updates गुहागर-विजयपूर राज्य मार्गावर तामखडीजवळ सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार तर सहाजण जखमी झाले आहेत.

विश्वास शामराव चौगुले (वय ५९) राहणार ता. कराड जि. सातारा असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर हिवरे (ता.खानापूर) व कराड येथील अन्य सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना भिवघाट येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत खानापूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, खानापूर कडून कराडकडे निघालेली चारचाकी मारुती सुझुकी सेलेरो (एम.एच. १२ के टी ५०८३) गाडीतून तानाजी जाधव रा.वाठार (ता.कराड) व विश्वास शामराव चौगुले,सुरेखा विश्वास चौगुले,लता विष्णू कुंभार सर्व राहणार कराड हे तामखडी नजीक आले असता विट्याकडून हिवरे कडे स्विफ्ट गाडी नंबर (एम.एच.१० डी व्ही.४४१४) जाणारे यश राजेंद्र वेदपाठक,संचिता यश वेदपाठक,शालन मोहन वेदपाठक यांच्या गाडीची समोरासमोर धडक झाली.

Visuals from the accident site near Tamakhadi on the Guhagar–Vijaypur highway showing damaged vehicles and emergency response efforts.
Bhandup Bus Accident :भांडुप स्टेशनजवळ 'बेस्ट बस'चा मोठा अपघात; चार ते पाच चिरडलं, दोन महिलांचा मृत्यू

यात दोन्ही गाड्यातील सर्व जण जखमी झाले. सर्व जखमींना तत्काळ भिवघाट येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान विश्वास चौगुले यांचा मृत्यू झाला असून इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर करत आहेत.

अपघाताची तीव्रता भीषण होती. दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. एका गाडीतील एअर बॅग उघडल्यामुळे मोठी जीवित हानी टळली. अपघात रस्त्याच्या मधोमध झाल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com