
पुणे जिल्ह्यातील गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांच्या संख्येत शनिवारी (ता. 24) वाढ झाली नसली तरी तर 14 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत. दरम्यान, शनिवारी नऊ संशयित रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे पुणे शहरामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम झालेल्या पुण्यातील रुग्णाचा सोलापूरमध्ये शनिवारी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला पुण्यातच जुलाबाचा त्रास सुरू झाला होता.