सदावर्ते इज बॅक! भिख्खू संघाची केली थेट 'आरएसएस'ची तुलना; वाद निर्माण होण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gunrtne sadavrte

सदावर्ते इज बॅक! भिख्खू संघाची केली थेट 'आरएसएस'ची तुलना; वाद निर्माण होण्याची शक्यता

मुंबई - आपल्या 'डंके की चोट'साठी परिचीत असलेले ऍड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा ऍक्टीव्ह झाले आहे. सदावर्ते यांनी आता थेट बौद्ध भिख्खू संघाची तुलना थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी केली आहे. यावरून विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. (Gunrtne Sadavrte news in Marathi)

हेही वाचा: सिंधूताईंचे नाव वापरून फसवणूक; अनाथ मुलींच्या लग्नाची बतावणी करून उकळले पैसे

सदावर्ते म्हणाले की, जगात दोनच विचार जागतीक विचार आहेत. आऱएसएस आणि भिख्खू संघ असे दोनच संघ आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाच्या हितकारी काम करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विनायक सावरकर यांच्या विचार काम करणे चुकीचं नाही.

मी भारतीय संविधानासोबत आहे. दोनच विचार जागतिक विचार आहे. हे दोन्ही विचार कधीच कोणासोबत हिंसा करणार नाही, असंही सदावर्ते यांनी म्हटलं. ते औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर! दिवाळीनंतर होणार सुनावणी

राज्यात एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर सदावर्ते फारसे चर्चेत नव्हते. मात्र आज औऱंगाबाद येथे आरएसएस आणि भिख्खू संघाविषयी विधान करून ते चर्चेत आले आहेत.

टॅग्स :Aurangabad News