
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा करावा अशी मागणी खासदार उदयनराजे यांनी केली होती. त्याचवेळी उदयनराजे यांनी महात्मा फुलेंच्या जयंतीदिनी केलेल्या विधानाने खळबळ उडाली होती. स्त्री शिक्षणाच्या इतिहासाबद्दल बोलताना त्यांनी थोरले प्रतापसिंह महाराज यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केल्याचं म्हटलं होतं. त्यावर राजकीय, सामाजिक क्षेत्रातून उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान, आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजेंवर टीका केलीय. उदयनराजेंनी इतिहास समजून सांगावा अन्यथा माफी मागावी असं सदावर्ते म्हणालेत.