Eknath Shinde News I हॉटेलमधील सेना आमदारांवर राष्ट्रवादीची नजर? दोन पदाधिकारी कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

guwahati mla ncp eye of two activist

राज्यातील राजकीय घडामोडींमुळे संपुर्ण देशाच्या नजरा राजकीय वर्तुळावर आहेत.

हॉटेलमधील सेना आमदारांवर राष्ट्रवादीची नजर? दोन पदाधिकारी कोण?

महाराष्ट्रातील राजकारण दिवसेंदिवस घडामोडींचा वेग वाढला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आमदारांसोबत बंड पुकारल्यामुळे वातावरण आणखी तापलं आहे. शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. सध्या या आमदारांचे वास्तव्य गुवाहाटीतील रॅडीसन्स ब्ल्यू या हॉटेलमध्ये आहे. दरम्यान, आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. (maharashtra politics)

गुवाहाटीतील त्या हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पदाधिकारी टेहळणी करताना दिसून आले आहेत. विशेष म्हणजे हे दोनही पदाधिकारी खासदार सुळे यांचे निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता हे दोन दोन पदाधिकारी कोण आहेत यावरील चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे सध्या या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसही यात सक्रिय होताना दिसत आहे.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीस 10 तास मुंबईबाहेर; तर शिंदे गटात सत्ता स्थापनेसाठी हालचाली

राज्यातील राजकीय घडामोडींमुळे संपुर्ण देशाच्या नजरा राजकीय वर्तुळावर आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये ठाण मांडून आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसही यात सक्रिय होताना दिसत आहे. शिंदेंसह त्यांच्या गटाचे वास्तव्य असलेल्या गुवाहाटीतील रॅडीसन्स ब्ल्यू या हॉटेलबाहेर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पदाधिकारी टेहळणी करताना दिसून आले आहेत. त्यामुळे आता अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

गुवाहाटीतील रॅडीसन्स ब्ल्यू या हॉटेलबाहेर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पदाधिकारी टेहळणी करताना दिसून आले आहेत. त्यापैकी कुशल करंजावणे हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सचिव आहेत तर सुहास उभे हे राज्य समन्वयक आहेत. हे दोघेही आज गुवाहाटीतील रॅडीसन्स ब्ल्यू दिसून आले आहेत. त्यामुळे आता या दोघांना पक्षाने काही विशेष जबाबदारी सोपवली आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.

हेही वाचा: शिवसेनेच्या बंडखोर ३७ आमदारांची गोची! आता उरले ‘हे’च तीन पर्याय

दरम्यान, बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांना अपात्र ठरवावं अशा आशयाची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. त्यावर आता 16 आमदारांना 48 तासांच्या आत त्यांचं मत माडण्यासाठी सांगण्यात आलं असून त्यांनी मत मांडलं नाही तर त्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे. त्यामुळे बंडखोरांना आता शिवसेनेचं कवच सोडावं लागणार आहे. उद्यापासून सर्वांना नोटिसा जातील आणि त्यांना सोमवारपर्यंत वेळ देण्यात येईल, यावर त्यांना उत्तर द्यायचं आहे, असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

Web Title: Guwahati Mla Ncp Eye On Two Activist Patrolling Out Of Hotel In Assam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..