
महिला सबलीकरण, स्त्री शिक्षण, पददलितांचे शिक्षण, सामाजिक परिवर्तन, स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंध आणि वंचित महिलांसाठी कार्य करणाऱ्या महिलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत निवेदनातून केली.