हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ सरकारसाठी पांढरा हत्ती ठरत असल्याचे दिसून येत आहे कारण, महामंडळाच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयांसाठी औषधे आणि वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्याचा राज्य सरकारचा प्रयोग यशस्वी झाला नसल्याचे समोर आले आहे. या महामंडळाने 2016 ते 17 2021 ते 22 या चार वर्षांत केवळ 29 टक्के औषधपुरवठा केल्याची तसेच सरकारने दिलेल्या निधीपैकी 2052 कोटींचा निधीही वापराविना पडून असल्याची धक्कादायक माहिती कॅगच्या अहवालातून समोर आली आहे.