
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) कर्जतजवळ प्रस्तावित हलाल लाइफस्टाईल टाउनशिप बाबत तक्रारीवर राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
तक्रारीत आरोप आहे की हा प्रकल्प केवळ मुस्लिमांसाठी प्रचारित होत असून, तो संविधानातील समानतेच्या तरतुदींचे उल्लंघन करतो.
NHRC ने महाराष्ट्र सरकारकडून दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल मागवला असून, आरोप खरे ठरल्यास कठोर कारवाई होणार आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) मुंबईजवळील कर्जत परिसरातील प्रस्तावित हलाल लाईफस्टाईल टाउनशिप प्रकल्पाबाबतच्या तक्रारीची दखल घेतली आहे. आयोगासमोर दाखल केलेल्या तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, ही टाउनशिप केवळ मुस्लिम समुदायासाठी विकसित आणि प्रचारित केली जात आहे, जी धार्मिक धृवीकरणाला प्रोत्साहन देत आहे यामुळे संविधानातील समानता आणि भेदभावविरोधी तरतुदींचे उल्लंघन होत आहे.