मराठी मर्द, मराठी मर्दानींना महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा - अमृता फडणवीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta Fadnvis
मराठी मर्द, मराठी मर्दानींना महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा - अमृता फडणवीस

मराठी मर्द, मराठी मर्दानींना महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा - अमृता फडणवीस

मुंबई : राज्यात सर्वत्र आज महाराष्ट्र दिन साजरा होत आहे. विविध राजकीय मंडळी तसेच मान्यवरांनी मराठीजनांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील आपल्या स्टाईलमध्ये मराठीजनांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Happy Maharashtra Day to Marathi men and women Amrita Fadnavis greatings)

शुभेच्छा देताना अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं असून यामध्ये त्यांनी महाराष्ट्राला सलाम करतानाची स्वतःची एक जीआयएफ इमेज आणि महाराष्ट्राच्या नकाशाचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोला त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये कॅप्शन दिलं आहे. त्यांनी म्हटलं, "देशभरातील मराठी मर्द आणि मराठी मर्दानींना महाराष्ट्रदिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!"

हेही वाचा: म्हणून तुम्ही कार्याध्यक्ष झालात नाहीतर...;संदीप देशपांडेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

दरम्यान, सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या सहकार्यांसह हुतात्मा चौक स्मारक परिसरात हुतात्म्यांना अभिवादन करत महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना सदिच्छा दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राजकीय भाष्य करणं टाळलं. आजच्या दिवशी आपण केवळ महाराष्ट्र दिनाच्या सदिच्छा देणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

पंरतू, काही वेळातच सोमय्या मैदानात देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडणार आहे. या सभेत ते महाविकास आघाडी सरकारला टार्गेट करणार असल्याचं त्यांचा कारभार चव्हाट्यावर आणणार असल्याचं भाजपकडून आधीच सांगण्यात आलं आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती दिली होती.

Web Title: Happy Maharashtra Day To Marathi Men And Women Amrita Fadnavis Greatings

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top