मानलं CM शिंदेंना! मध्यरात्रीच रक्तदान करुन केली नविन वर्षाची सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Happy New Year CM Eknath Shinde blood donate maharashtra politics

मानलं CM शिंदेंना! मध्यरात्रीच रक्तदान करुन केली नविन वर्षाची सुरुवात

जगभरात मोठ्या जल्लोषात नविन वर्षाची सुरुवात होत आहे. अनेकांना नव्या संकल्पाने नव्या वर्षाची सुरूवात करतात. पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीला घेतलेली भूमिका सध्या चर्चेत आली आहे. (Happy New Year CM Eknath Shinde blood donate maharashtra politics )

राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनीही मध्यरात्रीच जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या वर्षात विकासाचं पर्व सुरु व्हाव, राज्यातील शेतकरी समाधानी व्हावा, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होत, स्वत: रक्तदान करत नवीन वर्षाची सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी काही फोटो शेअर केले आहेत. ते रक्तदान शिबीरमधील असल्याचे पाहायाला मिळत आहे. ठाण्यातील जांभळी नाका शिवाजी मैदान येथे रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमात त्यांनी हजेर लावली होती.

आनंद दिघे याच्या संकल्पनेतून नवीन वर्षाची सुरुवात ही रक्तदानपासून करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना काळात याच ठिकाणी 11 हजाराहून अधिक जणांनी रक्तदान केलं होतं. याचा अनेक रुग्णांना फायदा झाल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

नववर्षाच्या स्वागतार्थ दिवंगत आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात येते. या रक्तदान शिबिरास उपस्थित राहून मुख्यमंत्र्यांनी रक्तदान केले. तसेच जमलेल्या रक्तदात्या बांधवांचे सन्मानपत्र देऊन कौतुक करीत अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.