KDCC Bank Election: हसन मुश्रीफ, संजय मंडलिकांनी बजावला मतदानाचा हक्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Mandlik,Hasan Mushrif

KDCC Election: हसन मुश्रीफ, संजय मंडलिकांनी बजावला मतदानाचा हक्क

कोल्हापूर : जिल्हा बँकेसाठी (KDCC Bank Election)आज सकाळपासूनच चुरशीने मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)तसेच शिवसेना (Shivsena) खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांनी मतदानाचा हक्क बजावला. सत्तारुढ पक्षाच्या कार्यकर्त्यानी पिवळ्या टोप्या घालून मतदान केंद्रावर हजेरी लावली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर अंत्यंत चुरस निर्माण झाल्याचे चित्र सकाळच्या एक तासाच्या मतदान वेळतच पाहायला मिळत आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. विकास संस्था गटातील १२ पैकी सहा जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १५ जागांसाठी ही निवडणूक आहे. निवडणूक रिंगणात ३३ उमेदवार उतरले असून अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी या निवडणुकीत शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली समविचारी पक्षांचे एकत्रित पॅनेल रिंगणात उतरल्याने या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. विकास संस्था गटातील सहा जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी त्या तालुक्यात या गटातील मतदारांना राखीव जागांवरील उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. मतदानासाठी कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातील मतदारांसाठी शहरात एक तर अन्य ११ तालुक्यात ३९ केंद्रावर मतदानाची सोय केली आहे.

हेही वाचा: कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी चुरशीने मतदान सुरु!

प्रक्रिया संस्था व नागरी बँक पतसंस्था गटातील निवडणुकीत मोठी चुरस आहे. प्रक्रिया गटातून खासदार प्रा. संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील हे विद्ममान संचालक विरोधी पॅनेलमधून रिंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात प्रदीप पाटील-भुयेकर व मदन कारंडे हे सत्तारूढ गटाचे उमेदवार आहेत. पतसंस्था गटातून विद्यमान संचालक अनिल पाटील हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत, त्यांच्या विरोधात सत्तारूढ गटातून आमदार प्रकाश आवाडे व विरोधी पॅनेलमधून प्रा. अर्जुन आबिटकर रिंगणात आहे. मातब्बरांच्या उमेदवारीमुळे या दोन गटातील लढत लक्षवेधी बनली असून त्यामुळे नेत्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (ता. ७) होणार आहे.

दृष्टिक्षेपात निवडणूक

एकूण संचालक २१

बिनविरोध जागा - ६

निवडून द्यायच्या जागा - १५

रिंगणातील उमेदवार - ३३

बँकेचे मतदार - ७ हजार ६५१

मतदान केंद्राची संख्या - ४०

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top