कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी चुरशीने मतदान सुरु! जिल्ह्यातील 12 तालुक्यात 40 केंद्रावर मतदान  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Voting has started for Kolhapur District Bank elections

सकाळच्या सत्रात मतदानाला ठरवादार सभासदानी मतदानास गर्दी केली.

कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी चुरशीने मतदान सुरु!

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil), ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif), आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil-Yadravkar) व खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (District Central Bank)निवडणुकीसाठी आज सकाळी 8 पासून मतदानाला (Voting)सुरुवात झाली.

हेही वाचा: कोल्हापूर महापालिकेला बांधकाम नियमित’ मधून महसूल मिळवण्याची संधी ‘

सकाळच्या सत्रात मतदानाला ठरवादार सभासदानी मतदानास गर्दी केली. जिल्ह्यातील १२ तालुक्यातील ४० केंद्रावर मतदान सुरू आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत मतदान होणार आहे. कागल शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज मतदान केंद्रावर सकाळी साडेसात पासूनच मतदारांनी गर्दी केली. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनीही मतदान केले. कागल तालुक्यातील हे संवेदनशील मतदान केंद्र असल्यामुळे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यातील 40 मतदान केंद्रावर चुरशीने मतदान सुरू आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KolhapurBankVoting
loading image
go to top