कोनशिलेवर लिहलं होतं हसन 'मुस्त्रीफ'; अजितदादांनी लावला कपाळाला हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोनशिलेवर लिहलं होतं हसन 'मुस्त्रीफ'; अजितदादांनी लावला कपाळाला हात

दरम्यान या सोहळ्यात घडलेल्या एका अनोख्या घटनेची सध्या चर्चा सुरु आहे.

कोनशिलेवर लिहलं होतं हसन 'मुस्त्रीफ'; अजितदादांनी लावला कपाळाला हात

अहमदनगर : जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पिंपळनेर येथे संत श्रेष्ठ निळोबाराय यांच्या अभंग गाथेच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन संपन्न सोहळा पार पडला. यावेळी संत निळोबाराय यांचे निवासस्थान असलेला वाडा आणि मंदिर याच्या जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान या सोहळ्यात घडलेल्या एका अनोख्या घटनेची सध्या चर्चा सुरु आहे.

हेही वाचा: अवकाळीमुळं बिघडलं ऊस उत्पादकांचं गणित; आर्थिक फटका बसणार?

या सोहळ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटनाच्या कोनशिलेवर असलेली एक मोठी चूक लक्षात आणून दिली आहे. या कोनशिलेवर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या नावात केली होती. हसन मुश्रीफ यांचं नाव चक्क 'हसन मुस्त्रीफ' असं लिहलं होतं. हे पाहून अजितदादांनी अक्षरश: कपाळाला हात लावला आहे.

अनेकदा 'ध' चा 'मा' करणाऱ्या गोष्टी आणि चुका होत असतात. मात्र जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांतचेचं नाव चुकीचे यावे आणि ते ही कोनशिलेवर हे थोडं हस्यास्पद आहे. दरम्यान हसन मुश्रीफ यांच्या नावामध्ये झालेली शाब्दिक चूक अजितदादांनी दाखवून दिली आणि कपाळावर हात मारुन घेतला. या कोनशिलेवर मुश्रीफऐवजी ‘मुस्त्रीफ’ अशी शब्दरचना करण्यात आली होती. यामुळे जिल्ह्यात याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

हेही वाचा: Pathankot Blast: आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला

loading image
go to top