esakal | सोमय्या बिचारे, त्यांना दोष देऊ नका; मुश्रीफांचे कार्यकर्त्यांना आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

सोमय्या बिचारे, त्यांना दोष देऊ नका; मुश्रीफांचे कार्यकर्त्यांना आवाहन

किरीट सोमय्यांनी कोल्हापुरात येऊन रहावं, त्यांचं मतपरिवर्तन होईल असेही मुश्रीफांनी आरोपांना उत्तर देताना म्हटलं.

सोमय्या बिचारे, त्यांना दोष देऊ नका; मुश्रीफांचे कार्यकर्त्यांना आवाहन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. आरोप करताना सोमय्यांनी आपल्याकडे २७०० पानी पुरावे असल्याचा दावाही केला आहे. हे आरोप फेटाळून लावताना हसन मुश्रीफ यांनी हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे.

'चंद्रकांत पाटलांनी समोर येऊन बोलावं'

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सोमय्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधत आहेत का असे विचारले असता हसन मुश्रीफ म्हणाले की, चंद्रकांत पाटलांमध्ये धाडस नाही, समोर येऊन बोलायला पाहिजे. तसंच किरीट सोमय्या यांचा निषेध वगैरे कार्यकर्त्यांनी करून नये. त्या बिचाऱ्याला यातलं काही माहिती नाही, त्यामुळे किरीट सोमय्यांचे पुतळे वगैरे जाळणं काही करू नये. किरीट सोमय्यांनी कोल्हापुरात येऊन रहावं, त्यांचं मतपरिवर्तन होईल असेही मुश्रीफांनी आरोपांना उत्तर देताना म्हटलं.

हेही वाचा: मुश्रीफांचा पलटवार, सोमय्यांविरोधात दाखल करणार १०० कोटींचा दावा

'सोमय्यामुळे भाजप भुईसपाट होईल'

दोन वर्षापुर्वी आपल्याकडे छापा टाकण्यात आला. त्यात काही मिळालं नाही. आता सोमय्यांनी जे काही आऱोप केलेत त्याप्रकरणी अब्रूनुकसानीचा दावा करणार तो माझ्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे त्याला तडा जाऊ नये यासाठी करणार आहे. बाकी त्यांना काही माहिती नाही, त्यांना दोष देऊ नका असेही हसन मुश्रीफ म्हणाले. सोमय्यामुळे भाजप कोल्हापुरात भुईसपाट होईल. पुन्हा मविआचं सरकार येईल तेव्हा मी त्यांच्या गळ्यात हार घालेन असेही मुश्रीफ यांनी यावेळी म्हटलं.

loading image
go to top