esakal | सोमय्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार, हसन मुश्रीफांचे रोखठोक उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

mushrif

मुश्रीफांचा पलटवार, सोमय्यांविरोधात दाखल करणार १०० कोटींचा दावा

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (bjp leader kirit somaiya) यांनी ११ नेत्यांची नावेही सांगितली होती. दरम्यान, त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करत २७०० पानांचा पुरावा असल्याचा दावाही सोमय्यांनी केला आहे. त्यालाच आता मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif replied to kirit somaiya) यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, ''मी आतापर्यंत ५०-५० कोटींचे अब्रुनुकसानीचे सहा दावे दाखल केले आहेत. आता सातवा दावा दाखल करणार आहे. माझ्या कुटुंबाची आणि माझी बदनामी झाली. गेल्या १७ वर्षांपासून मी राजकारणात आहेत. माझ्यावर कोणी आरोप केला नाही. भाजपसारखे चिक्की घोटाळे आम्ही केले नाही. येत्या दोन आठवड्यात फौजदारी अब्रुनुकसानीची १०० कोटींचा दावा कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात करतोय.''

हेही वाचा: मोदी सरकारकडून किरिट सोमय्यांना झेड सुरक्षा

'मला माहिती होतं, कधी ना कधी बिनबुडाचे आणि खोटे आरोप केले जातील. सोमय्यांनी १२७ कोटी घोटाळ्याचा आरोप केला. मनापासून तिव्र निषेध करतो. त्यांनी जे कागदपत्रे दाखविली ते सर्व संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. निवडणुकीमध्ये कागदपत्रे आपण दाखल करतो ते उपलब्ध असतात. विशेष यांनी असे काही केले नाही.'

बिचाऱ्या सोमय्यांना काहीच माहिती नाही -

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी माझ्या घरावर धाड टाकली होती. सर्व निवासस्थानावर धाड टाकली. त्यात काहीच आढळले नाही. कारखान्यामध्ये त्यांना काही संशय होता. ते प्रकरण आता न्याप्रविष्ट आहे. धाड टाकून अडीच वर्ष झाली. त्यात अजून काहीच कारवाई झाली. त्याबाबत मी सर्व उत्तरे दिलेली आहेत. आता किरीट सोमय्या यांनी बेनामी आहे, मनीलाँडरींग आहे, असा शोध कुठून लावला? कदाचित सोमय्या या बिचाऱ्यांना काही माहिती नसावं. वास्तविक त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे होती. चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी सोमय्यांना माहिती दिली असावी. त्यामुळे त्यांनी हे आरोप केले असावे. त्यांना कागलला येऊन माहिती घ्यायला पाहिजे होती, असेही मुश्रीफ म्हणाले.

विनाकारण भाजपची प्रतिमा मलीन होईल, असे वक्तव्य किरीट सोमय्यांनी करू नये. गोरगरीबांना राष्ट्रीय तपास संस्थांच्या अशा कारवायांमुळे फार चीड येते. येणाऱ्या भाजपच्या पराभवाला किरीट सोमय्या जबाबदारी ठरतील. जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत येईल, तेव्हा मी किरीट सोमय्याला हार घालेन, असेही मुश्रीफ म्हणाले.

loading image
go to top