
समरजितसिंह घाटगे यांच्या आरोपांना मुश्रीफ यांनी सडेतोड उत्तर दिलंय
समरजितसिंहांना हे धाडस महागात पडेल; मुश्रीफांचा थेट इशारा
कोल्हापूरचे राजकारण सध्या तापलं आहे. हसन मुश्रीफ यांच्या नावामध्ये प्रभू श्रीरामांचं नाव चित्रित केल्यामुळं नवा वाद निर्माण झाला आहे. प्रभू श्रीरामांच्या नावाबरोबर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव जोडण्याचा प्रकार झालाय तो अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे समरजीतसिंह घाटगे यांनी केली आहे. बहुजन समाजाच्या भावना दुखावणारे हे कृत्य अत्यंत असंवेदनशील असून या कृत्याविरुद्ध कागल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, समरजितसिंह घाटगे यांच्या आरोपांना मुश्रीफ यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. हे सगळं प्रकरण समरजित घाटगे यांना महागात पडणार असा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे.
हेही वाचा: मुश्रीफांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरुन वाद, राजकारण तापणार?
यावेळी ते म्हणाले, मी माझ्या कार्यकर्त्यांना समय राखण्याचे आवाहन केलं आहे. आता अडीच वर्षांपासून गायब अरणारे आणि झटका आल्याप्रमाणे उठले आहेत. ही जाहिरात गोकुळच्या संचालकांनी दिली आहे. त्याच्याशी माझा काही संबंध नाही. त्यांनी माझ्याप्रेमापोटी ती जाहिरता दिला आहे. आम्ही शांत आहोत अन्यथा घाटगे हे आमच्या पासंगालाही पुरणार नाहीत, असा दमही मुश्रीफ यांनी दिलाय आहे. गेल्या 50 वर्षांपासून मी राम नवमीला वाढदिवस साजरा करतोय. मग आताच यांच्या पोटात का दुखत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. हसन मुश्रीफ म्हणजे वडाचे भक्कम झाड असून कुंडीतल्या झाडाला पाणी घातल्याशिवाय वाढत नाही, असा टोला मुश्रीफांनी लगावला आहे. त्याचबरोबर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या व्यक्तीला राजकारण काय कळणार असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, घटना अशी की, रामनवमी दिवशी मंत्री हसन मुश्रीफ यांचाही वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त त्यांनी दिलेल्या जाहिरातीत हसन मुश्रीफ यांचे नाव आहे. या जाहिरातीला राम नवमीची डिझाइन करण्यात आली असल्याने भाजपचे नेते समरजितसिंह घाडगे यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. अशा प्रकारे राम या शब्दाची डिझाईन कशी काय करू शकता तुम्ही रामापेक्षा तुम्ही मोठे आहात का असा सवालही त्यांनी केला आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीवर कोल्हापूरचे राजकारण तापलं असल्यानं आता या नव्या वादामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. यात प्रभु श्रीराम यांचा एकेरी उल्लेख केला असल्याने घाटगे यांनी कागल पोलिस ठाण्यात कार्यकर्त्यांच्या मोर्चासह हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार देणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा: पवारांच्या घरावर हल्ला : सदावर्ते आणखी अडचणीत! पत्नीविरोधात गुन्हा दाखल
Web Title: Hasan Mushrif Reaction On Samarjitsinh Ghatage Statement On Advertise Of Ram Navami
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..