esakal | मोदी सरकारकडून किरिट सोमय्यांना झेड सुरक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya

मोदी सरकारकडून किरिट सोमय्यांना झेड सुरक्षा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - भाजप नेते किरिट सोमय्या हे सातत्यानं महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असून त्यांनी ठाकरे सरकारमधील नेत्यांसह मंत्र्यांचे घोटाळे उघड करू असं म्हटलं होतं. त्यानंतर किरिट सोमय्या यांना धमक्या येऊ लागल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर सोमय्यांनी केंद्राकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. आता मोदी सरकारने किरिट सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवली आहे.

किरिट सोम्मयांची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. आता झेड सुरक्षा मिळाल्यानंतर त्यांच्याभोवती CISF जवानांचे कडे असणार आहे. त्यांच्या ताफ्यातील जवानांना राहण्यासाठी सोमय्यांच्या घराच्या बाजूलाच बॅरेक तायर करण्यात आले आहे.

भारत सरकार वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षा पुरवते. यात एक्स, वाय, झेड आणि झेड प्लस दर्जाच्या सुरक्षांचा समावेश आहे. झेड दर्जाच्या सुरक्षेमध्ये २२ सुरक्षा रक्षकांचा समावेश असतो. यात ४ ते ५ एनएसजी कमांडो आणि एक वरिष्ठ पोलिस अधिकारीसुद्धा असतात.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीसांवर भाजपने सोपवली नवी जबाबदारी

किरिट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील ११ नेत्यांची नावे जाहीर करत कथित भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. यात मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांसह मंत्र्यांनी घोटाळा केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे ते मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि परिवहन मंत्री अनिल परब, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचीही नावे होती. तसंच अनिल परब यांची चौकशी सुरु असून जितेंद्र आव्हाड आणि भावना गवळी यांचा पुढचा नंबर असल्याचं सोमय्यांनी म्हटलं होतं.

loading image
go to top