KDCC Election: आम्हीच प्रचंड मतांनी विजयी होऊ ; मुश्रीफांचा विश्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hasan mushrif

KDCC Election: आम्हीच प्रचंड मतांनी विजयी होऊ ; मुश्रीफांचा विश्वास

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील, (Satej Patil)ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, (Hasan Mushrif)आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil-Yadravkar)व खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आम्हीच प्रचंड मतांनी विजयी होऊ असा विश्वास मुश्रीफांनी व्यक्त केला आहे. आज सकाळी 8 पासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदानाला ठरवादार सभासदानी गर्दी केली. यावेळी ग्रमाविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद शाधला.

पुढे ते म्हणाले, बॅंकेत सर्वांनी एकोप्याने येत पॅनल करावे असा आमचा प्रयत्न होता. मात्र शिवसेना अडून बसली. दोन जागा आम्ही आधीच दिल्या होत्या.मात्र काही मंडळी राक्षसी वृत्तीची असल्याने ही निवडणूक आमच्यावर लादली गेली आहे. आरोप- प्रत्यारोप जरी झाले असले तरी मतदारांच्यावर काहीही परीणाम झाला नाही. गेल्या सहा वर्षात बॅंकेने जी प्रगती केली आहे ती विरोधकही मान्य करत आहेत.आमचे पॅनेल प्रचंड मतांनी विजयी होणारच.

शिवसेनेचा वापर केला गेला असं विजय देवणे यांनी आरोप केला होता यावर मुश्रीफ म्हणाले,आम्ही एकोप्याने राहण्याचा प्रयत्न केला मात्र याला यश आले नाही. साडे सहावर्षापूर्वी जेव्हा बॅंकेचा कारभार हातात घेतला तेव्हा बॅंकेच्या ठेवी तीन हजार कोटी होत्या.आज सात हजार दोनशे कोटीच्या ठेवी झाल्या आहेत. सलग दोन वर्षे चाळीस कोटी नफा मिळवला आहे. १८ कोटी रुपये इनकम टॅक्स भरणारी देशातील पहिली जिल्हावर्ती बॅंक ठरलेली आहे. तीन लाख कर्ज देण्याचा निर्णय पहिल्यांदा बॅंकेने घेतला यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय राज्यभर लागू केला. आता ५ लाखापर्यंत कर्ज शून्य टक्के दराने देण्याचा निर्णय घेतला आहे असे ही ते म्हणाले. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवणार असल्याची माहिती यावेळी मुश्रीफांनी दिली.

हेही वाचा: KDCC Election: हसन मुश्रीफ, संजय मंडलिकांनी बजावला मतदानाचा हक्क

दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी गगनबावडा येथे मतदानाचा हक्क बजावला. हातकणंगले मतदान केंद्रावर आमदार प्रकाश आवाडे, राजूबाबा आवळे, महादेवराव महाडिक, निवेदिता माने, मदन कारंडे यांनी मतदान केले. तर प्रकाश आबिटकर यांनी केंद्रीय विद्या मंदीर, गारगोटी, ता.भुदरगड येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचे सर्व उमेदवार बहुमतांनी विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top