
Kolhapur : जिल्हा बँकेवर हसन मुश्रीफ बिनविरोध; 5 जणांची माघार
कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या (Bank Election) निवडणुकीत आज कागल विकास संस्था गटातून पाच उमेदवारांनी आज एकाच दिवशी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या गटातून बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची आज बिनविरोध निवड झाली.
पालकंमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या पाठोपाठ मुश्रीफही बिनविरोध झाल्याने सत्तारूढ गटाला निवडणुकीपुर्वीच मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गगनबावडा तालुका विकास संस्था गटातून यापुर्वीच पालकमंत्री पाटील बिनविरोध विजयी झाले आहेत. कागल तालुक्यातून मुश्रीफ यांचे स्वतःचे चार तर इतर पाच उमेदवारांचे मिळून नऊ अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघारीचा उद्या शेवटचा दिवस आहे, पण आजच या गटातून प्रताप दत्तात्रय पाटील, युवराज अर्जुनराव पाटील, दत्तात्रय तुकाराम खराडे, बाबासो हिंदुराव पाटील व धनंजय सदाशिवराव पाटील यांनी माघार घेतल्याने मुश्रीफ या गटातून बिनविरोध झाले.
हेही वाचा: Panama Paper Leak: ऐश्वर्यासह तिच्या कुटुंबातील 'हे' सदस्य होते कंपनात भागीदार
सत्तारूढ आघाडीचे पॅनेल ठरवण्यासाठी मुश्रीफ आज दिवसभर शासकीय विश्रामगृहार ठाण मांडून आहेत. दुपारी तीन वाजता माघारीची मुदत संपण्यापुर्वीच या गटातून इतरांनी माघार घेतल्याने मुश्रीफ बिनविरोध झाल्यचे समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्रामगृहावर त्यांचा सत्कार करून त्यांच्या जयघोषाच्या घोषणा दिल्या.
Web Title: Hasan Mushrif Unopposed Selection On District Bank Withdrawal Of 5 Persons Kolhapur Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..