Hate Speech Case: 'जनता शिंदे सरकारला नपुंसक म्हणतेय, काल कोर्टानंही...'

न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकार षंढ आहे, ते काहीच करत नाही, अशी टीका केली
Hate Speech Case Maharashtra Government Sanjay Raut reaction maharashtra politics
Hate Speech Case Maharashtra Government Sanjay Raut reaction maharashtra politics

शिंदे फडणवीस सरकारविरोधात दाखल केलेल्या याचीकेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकार षंढ आहे, ते काहीच करत नाही, अशी टीका केली आहे. हाच मुद्दा पकडत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Hate Speech Case Maharashtra Government Sanjay Raut reaction maharashtra politics )

काय म्हणाले संजय राऊत?

गेल्या सहा महिन्यांपासून जनता शिंदे सरकारला नपुंसक म्हणतेय तेच काल कोर्टान म्हटलं आहे. यामागे आम्ही नाही. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या निरीक्षणावरुन सरकारची प्रतिष्ठा काय आहे. कोणत्या पद्धतीने कामं करत? हे एका वाक्यात स्पष्ट झालं.

आत्तापर्यंत न्यायालयाने कोणत्याही राज्याच्या सरकारविषयी नपुंसक हा शब्द वापरला नव्हता. आम्ही म्हणतोय सरकार अस्तित्वात नाही. विशेषता मुख्यमंत्री स्वतःला गुलाम असल्याची जाणीव करुन देतायत. याच त्यांच्या भूमिकेवर सर्वोच्चा न्यायालयाने हल्लाबोल केला.

Hate Speech Case Maharashtra Government Sanjay Raut reaction maharashtra politics
Hate Speech Case : महाराष्ट्र सरकार षंढ आहे, ते काहीच करत नाही - सर्वोच्च न्यायालय

राज्यात अस्थिरता रहावी, दंगली व्हाव्यात, धार्मिक जातीय तणाव वाढावेत असं काम सरकार करतं. आम्ही सर्वोच्च न्यायालायचे आभार मानतो त्यांनी एकच हातोडा माराल. त्यामुळे आता एकच अपेक्षा करतो की त्यांचा डोकं ठिकणावर यावं.

Hate Speech Case Maharashtra Government Sanjay Raut reaction maharashtra politics
PM नरेंद्र मोदींना अडकवण्यासाठी माझ्यावर दबाव, अमित शाहांचा मोठा खुलासा

छत्रपती संभाजी नगरमध्ये रात्री राम मंदीरसमोर झालेल्या वादवर सवाल उपस्थित केले असता. राऊत यांनी राज्याला गृहमंत्री आहेत का? गृहमंत्रालय अस्तित्वात आहे का? असे सवाल उपस्थित केले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाष्य केलं.

फडणवीस दिसत नाहीत. निराश दिसत आहेत. वैफल्यग्रस्त दिसतायत. काल संभाजीनगरमध्ये जी परिस्थिती झाली ते सरकारचं अपयश आहे. अशी टीका राऊत यांनी यावेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com