महेश बोटले व 'न्यासा'नेच फोडली परीक्षेची प्रश्‍नपत्रिका| Health Department Exam Fraud | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

महेश बोटले व 'न्यासा'नेच फोडली परीक्षेची प्रश्‍नपत्रिका

पुणे : आरोग्य विभागाच्या (Health Department) गट "ड'च्या पेपरफुटीप्रकरणी सायबर पोलिसांनी (Cyber Police) आणखी दोन मुख्य दलालांना मंगळवारी अटक (Arrest) केली. त्यानंतर गट "क'चाही पेपर फुटल्याचे निष्पन्न झाले असून आरोग्य विभागाचा सहसंचालक डॉ.महेश बोटले व परीक्षेची जबाबदारी असणाऱ्या न्यासा (NYASA) कंपनीनेच प्रश्‍नत्रिका फोडल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. पेपर छपाईच्या ठिकाणाहूनच मुख्य दलालांना पेपर मिळाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आत्तापर्यंत सडकून टिका झालेल्या न्यासा कंपनीचीही चौकशी होणार आहे.

दरम्यान, गट "क'च्या पेपरफुटी प्रकरणी देखील सायबर पोलिसांनी आणखी एक स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशीद रामहरी गायकवाड (वय 43, रा. शेवाळकर गार्डन, अंबाझरी रस्ता, नागपूर मूळ रा. शेगाव, अमरावती) व राहुल घनराज लिघोंट (वय 35, रा. देवी पार्क, शेगाव, अमरावती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा: आधी 'त्या' बोलेरो गाड्यांची थकबाकी भरा; सावंतांचा नितेश राणेंना टोला

डॉ.बोटले व न्यासा कंपनीने प्रश्नपत्रिका फोडल्याचे तपासामध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये प्रशांत बगडिरे, डॉ. संदीप जोगदंड, राजेंद्र सानप यांनी महत्वाची भुमिका बजावल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक आयुक्त विजय पळसुले व वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके उपस्थित होते.

पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या गट "ड'साठी 31 ऑक्‍टोबर रोजी झालेल्या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी डॉ.महेश बोटले, प्रशांत बडगिरे, डॉ.संदिप जोगदंड यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, दलाल अशा 18 जणांना अटक केली होती. त्यांनी गट "ड'च्या प्रश्नपत्रिकेमधील 100 प्रश्नांपैकी 92 प्रश्न परीक्षेपूर्वीच फोडल्याचे त्यांच्याकडील तांत्रिक पुराव्यांवरुन स्पष्ट झाले होते. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच

24 ऑक्‍टोबर रोजी झालेल्या गट "क'चीही प्रश्‍नत्रिका फोडण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी गायकवाड व लिघोंट यांना अटक केली. दोघेही गट "क'ची प्रश्‍नत्रिका फोडणाऱ्यांमधील प्रमुख दलाल आहेत. त्यांनीच प्रश्नपत्रिका फोडून दलालांमार्फत पैसे घेतल्याची माहिती पोलिसांनता मिळाली. त्यावरुन पोलिसांनी डॉ. बोटले याच्याकडे चौकशी केली, तेव्हा त्यानेच संबंधित परीक्षा घेणाऱ्या न्यासाचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे सांगितले.

गट 'क' च्या प्रश्‍नत्रिका फुटीप्रकरणी पाचवा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये दलालांच्या दोन साखळ्या होत्या. त्यापैकी दुसऱ्या साखळीतील दोन मुख्य दलालांना अटक केली आहे. याप्रकरणी डॉ.महेश बोटले याची चौकशी सुरू होती. त्यावेळी त्याने या प्रकरणामध्ये न्यासाचा सहभाग असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार, न्यासाच्या संचालकांचीही चौकशी केली जाईल. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होऊ शकते.'' अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त.

हेही वाचा: म्यॅव म्यॅव ते अध्यक्षपदाची निवडणूक; हिवाळी अधिवेशन गाजलं 'या' सात मुद्यांनी

असे फुटले प्रश्‍नत्रिकेला पाय !

आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या प्रश्‍नत्रिका काढणाऱ्या समितीमध्ये डॉ. महेश बोटले होता. त्याने पेपर छपाई करण्यात येणाऱ्या ठिकाणावरूनच प्रश्‍नत्रिका फोडली, तसेच महत्वाच्या दलाल, क्‍लासचालकांमार्फत ती उमेदवारांपर्यंत पोचवली. त्यामध्ये निशीद गायकवाड व राहूल लिघोंट यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनीच उमेदवारांपर्यंत प्रश्‍नत्रिका पोचविण्याचे काम केले.

* आरोग्य, म्हाडा, टीईटी पेपरफुटी प्रकरण

  • दाखल गुन्हे - 05

  • अटक आरोपी - 28

  • जप्त मुद्देमाल - 6 कोटी

Web Title: Health Department Exam Fraud Mahesh Botle Nyasa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top