

पुणे : आरोग्य विभागाच्या गट 'ड' च्या परीक्षेचा पेपर रविवारी फुटला. भंडारा जिल्ह्यातील सुलोचना देवी पारधी विद्यालय, मोहाडी या केंद्रावरील उमेदवारांनी हा पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आणला. यासंदर्भातील एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या संपूर्ण फुटीप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीनं आरोग्य विभागाच्या संचालक अर्चना पाटील यांच्याकडे केली आहे.
भंडारा जिल्ह्यतील एका परीक्षा केंद्रावर आरोग्य विभागाच्या गट ड च्या परीक्षेदरम्यान उमेदवारांना प्रश्नपत्रिका वाटण्यासाठी गठ्ठा आणलेला असताना या गठ्ठ्याचं सील फुटलेलं असल्याचं काही उमेदवारांना आढळून आलं. यानंतर त्यांनी यावर आक्षेप घेत प्रश्नपत्रिकांचं वाटप करण्यापासून संबंधितांना रोखलं आणि या संपूर्ण घटनेचं व्हिडिओ चित्रिकरण केलं आणि तो व्हिडिओ युट्यूबवरील एका चॅनलवर अपलोड करण्यात आला. दरम्यान, आज झालेला गट 'ड'चा पेपर फुटीप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीनं आरोग्य विभागाच्या संचालक अर्चना पाटील यांच्याकडे केली आहे.
संपूर्ण भरतीची SIT मार्फत चौकशी व्हावी
दरम्यान, आरोग्य विभागाच्या परीक्षेत जो गोंधळ निर्माण झालेला आहे, या संपूर्ण भरतीची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी युवक क्रांती दलानं केली आहे. त्याचबरोबर येथून पुढे होणाऱ्या 'ड' विभागाच्या परीक्षा विश्वासार्हता असलेल्या संस्थेकडून घेण्यात याव्यात तसेच इतर सर्व परीक्षा MPSC मार्फतच घेण्यात याव्यात, अशी मागणीही युक्रांदकडून करण्यात आली. MPSC च्या रिक्त असलेल्या सदस्यांची नियुक्ती लवकरात लवकर करून MPSC ला आणखी सक्षमीकरण करण्यात यावे. याबाबत राज्य शासन, विरोधी पक्ष तसेच राज्यपाल महोदय यांच्याकडे मागणी केलीली आहे, असं युक्रांद, पुणे चे उपाध्यक्ष कमलाकर शेटे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.